Women’s Day 2024: मोठ्या पडद्यावरही ‘महिला राज’; महिला दिनानिमित्त ‘हे’ चित्रपट नक्की बघा!

गेल्या काही काळापासून महिलांवर आधारित असणाऱ्या चित्रपटांच्या निर्मितीत वाढ झालेली दिसत आहे. ‘वुमन सेंट्रिक’ चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते.हे चित्रपट अनेकांना प्रेरणा देतात. आज जागतिक महिलादिनानिमित्त (Women’s Day 2024) तुम्ही महिलांवर आधारित हे चित्रपट बघू शकतात.

मॉम

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचा मॉम हा चित्रपट हा आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. एक महिला तिच्या मुलांसाठी काय-काय करु शकते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटात श्रीदेवींनी देवकी ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.

डार्लिंग

आलिया भट्ट आणि शेफाली शाह यांच्या डार्लिंग्स या चित्रपटात पतीच्या अत्याचार सामना करणाऱ्या महिलेची कथ मांडण्यात आली आहे. डार्लिंग्स ही भावनांचा रोलरकोस्टर राइड आहे. या चित्रपटात विजय वर्मानं देखील काम केलं आहे.

क्विन

कंगना रणौतचा क्विन हा चित्रपट एका अशा मुलीवर आधारित आहे, जी हनिमुनला एकटी जाते. होणाऱ्या नवऱ्याने लग्नास नकार दिल्यावर आत्मविश्वास गमावलेली राणी ही हनिमुनला पॅरिस आणि ॲम्स्टरडॅमला एकटी जाते. राणीला तिच्या या सोलो हनिमुनमध्ये विविध अनुभव येतात. या चित्रपटातीसल कंगनाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

मिमी

मिमी हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला.या चित्रपटात क्रिती सॅनननं प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटात मिमी राठोडची कथा दाखण्यात आली आहे जी परदेशी जोडप्यासाठी सरोगेट मदर बनण्याचा निर्णय घेते.

‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’

‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झाला. हा चित्रपट एका जोडप्याच्या जीवनाच्या कथेपासून प्रेरित आहे ज्यांची मुले 2011 मध्ये नॉर्वेचे अधिकारी घेऊन जातात, या चित्रपटात मुलांसाठी आईनं दिलेला लढा हा प्रेरित करतो.