हसन मुश्रीफांचा थेट हल्लाबोल!

कोल्हापूर लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या चिन्हावर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्यानंतर महायुतीमधून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कोल्हापूरचे पालकमंत्री तथा महायुतीमधील वजनदार नेते हसन मुश्रीफ यांनी शाहू महाराज आदरणीय स्थान असून त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरू नये, असे वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती. आता आमदारसतेज पाटील यांनी त्याच्या विधानाचा समाचार घेत जर महाराजाबद्दलआदरअसेल,तर ही निवडणूक बिनविरोध करा,असा टोला लगावला होता. आता मुश्रीफयांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर देत पाटील यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे. 

हसन मुश्रीफ म्हणाले की, सतेज पाटलांकडे इतका बालिशपणा कुठून आला? हे समजत नसल्याचे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकारणामध्ये असं काही होत नसतं. आम्ही आदराच्या भावनेने शाहू महाराज यांच्याबद्दल बोललो होतो. आमच्या श्रद्धेला कुठेही डाग लागू नये ही आमची भावना होती असे त्यांनी स्पष्ट केले.