हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारीच्या अनुंषगाने रोज नवनवीन नावे पुढे येत आहेत. विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्याबद्दल असलेल्या नाराजीमुळे उमेदवारी बदलाच्या हालचालीने वेग घेतला आहे.
महायुतीतुन आतापर्यंत खासदार धैर्यशील माने, ‘गोकुळ’च्या संचालिका शौमिका महाडिक आणि पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांच्या नावावर चाचपणी सुरू झाली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणावरच येथील माहितीचा उमेदवार ठरणार आहे. त्या दृष्टीने महायुती जबाबदारीने पावले टाकत आहे.
भाजपची (BJP) दुसरी यादी लवकरच जाहीर होणार असल्याने महायुतीमध्ये हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार बदलाच्या हालचाली वाढल्या आहेत. आमदार विनय कोरे यांच्यासह संजय पाटील यड्रावकर यांच्या नावावर मुंबईत चर्चा झाली आहे. महायुतीतील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने डॉ. संजय पाटील हे नाव नव्याने चर्चेत आणले आहे.