नरंदे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून अमानुष मारहाण, पालकांतून तिव्र संताप….

सध्या अनेक भागात गुन्हेगारी प्रमाणात वाढ झालेली आहे. खून, किरकोळ कारणांमधून मारामारी या प्रकारात वाढ होत असल्याचे चित्र तर आपणाला पहायला मिळत आहे. तसेच फसवणूक, अत्याचार याचेहि प्रमाण वाढतच चालले आहे. हातकणंगले तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावातील नरंदे हायस्कूलमध्ये स्नेहसंमेलनाचा सराव करत असताना गोंधळ सहन न झाल्याने एका वर्गशिक्षकाने २ विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.

सदर मुलांना उचारासाठी हातकणंगले येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी संबंधीत मुलांच्या पालकांनी हातकणंगले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतू रुग्णालय आणि शिक्षण विभागाचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिल्याने पालकांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे.