दीक्षाभूमीच्या दर्शनाने नवी ऊर्जा मिळाली ; आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूर येथे असून त्यांच्या आमदारकीच्या कार्यकिर्दीतील हे पहिलेच अधिवेशन आहे. आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपुरातील दीक्षाभूमीला भेट देत अभिवादन केले आहे. पवित्र दीक्षाभूमी येथे भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्याचे भाग्य मला मिळाले यामुळे खूप प्रसन्न वाटत आहे. पवित्र दीक्षाभूमीच्या दर्शनाने नवी ऊर्जा मिळाली असून दीक्षाभूमी सर्वांना निश्चितच प्रेरणा देत राहील अशा भावना आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी दीक्षाभूमीवर व्यक्त केल्या.