लवकरच 18 व्या लोकसभेसाठी निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे. आगामी निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू झाली आहे. प्रचार सभांना सुरवात झाली आहे.राजकीय पक्षांनी आपले अधिकृत उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली असून आगामी निवडणुकीत आपला विजय व्हावा यासाठी राजकीय पक्षांनी आता कंबर कसली आहे.
दरम्यान आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 50 टक्क्यांपर्यंत वाढवला गेला आहे.
शासनाने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महागाई भत्त्यात झालेली ही सुधारणा 1 जानेवारी 2024 पासून लागू राहणार आहे. पण वाढीव महागाई भत्ताचा रोख लाभ एप्रिलमध्ये दिला जाईल. अर्थातच मार्च महिन्याचे जे वेतन कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्यात मिळेल त्यासोबत याचा लाभ दिला जाणार आहे. शिवाय, महागाई भत्त्याबरोबरच इतर भत्त्यांमध्येही वाढ झाली आहे.