ज्येष्ठ नेते अरुणराव इंगवले यांच्या विशेष प्रयत्नातून नगरोत्थान व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून हातकणंगले विकास कामांसाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या हातकणंगले नगरपंचायत हद्दीतील अडीच कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ हा शुक्रवारी म्हणजेच 15 मार्च रोजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
हा निधी मंजूर करण्यासाठी खा. धीर्यशील माने, खा. धनंजय महाडिक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे विशेष सहकार्य लाभले.