इस्लामपूर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धा महाराष्ट्र शासनाने या शैक्षणिक वर्षापासून सुरुवात केली आहे. शाळा स्वच्छ व सुंदर ठेवून स्वच्छतेचे महत्त्व लहानपणापासूनच कळावे यासाठी ही स्पर्धा सर्व शाळांमधून घेतली जाते. या स्पर्धेसाठी केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक यांची शासनाने नेमलेले पथक असते.
हे पथक प्रत्येक शाळेला भेट देऊन तपासणी करते. त्यातून क्रमांक काढले जातात. तपासणीतून आचार्य जावडेकर गुरुकुल इस्लामपूर या शाळेला केंद्रात चतुर्थ क्रमांक मिळाला आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका के. एस. पाटील व शालेय समिती अध्यक्ष माणिक मोरे यांचे मार्गदर्शन
लाभले.