‘कुछ कुछ होता है’ पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार!

बॉलीवूडमध्ये सर्वोत्कृष्ट १०० शंभर चित्रपटांमध्ये करण जोहरच्या कुछ कुछ होता है या चित्रपटाचे नाव येतेच. ९० च्या दशकांत या चित्रपटानं कमाल केली होती. त्यातील गाणी, संवाद, अभिनेत्यांचा अभिनय आणि कथा या गोष्टी प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेल्या होत्या.

राहुल खन्ना, अंजली शर्मा या दोन्ही व्यक्तिरेखा आजही कित्येक चाहत्यांच्या मनात कायम आहे. किंग खान शाहरुख खान, काजोल, रानी मुखर्जी, अनुपम खेर यांच्या भूमिकांनी या चित्रपटाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले होते. करण जोहरच्या कुछ कुछ होता है चित्रपटाला आता २५ वर्षे पूर्ण होणार असून त्यानिमित्तानं निर्माता-दिग्दर्शक करण जोहरनं एक मोठा निर्णय घेतला आहे.

करणनं घेतलेला निर्णय हा त्याच्या चाहत्यांसाठी, प्रेक्षकांसाठी मोठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे. १६ ऑक्टोबर १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला कुछ कुछ होता है हा चित्रपट रोजी पुन्हा दाखवला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ही तमाम शाहरुख, काजोल अन राणीच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.