बारावी पास आहात? मग लगेचच करा अर्ज! बंपर भरतीला सुरूवात……

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. विशेष म्हणजे नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलच अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. थेट पोलिस विभागात नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. चला तर मग अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

ही भरती प्रक्रिया मुंबई कारागृह पोलिस विभाग अंतर्गत पार पडत आहे. या भरती प्रक्रियेतून पोलिस शिपाई ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. पोलिस शिपाई या पदावर काम करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx या साईटवर जा. mahaprisons.gov.in या साईटवरआपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 मार्च 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे.

ही भरती प्रक्रिया तब्बल 717 पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी बारावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. 18 ते 28 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये थोडी सूट देण्यात आलीये.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना शारीरिक चाचणी, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा ही द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. यानंतर उमेदवारांची निवडही केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागेल.