नेलकरंजी- परिसरात उर्वरीत विकास कामांना न्याय देऊ; सुहासभैया बाबर

काँग्रेसचे आटपाडी तालुकाध्यक्ष जयदीप भोसले यांनी विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचे उमेदवार सुहास बाबर यांना पाठिबा दिल्याने आटपाडी तालुक्यात शिवसेनेला ताकद मिळाली आहे. नेलकरंजी येथे जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील व सुहास बाबर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


वडील जाण्याचा आज जो सुहासभैयांच्यावर प्रसंग आला आहे. हा प्रसंग माझ्यावरदेखील आला होता. स्व. मोहनकाका भोसले गेल्यानंतर माझ्या पाठीशी अनिलभाऊ ठामपणे उभे होते. त्यामुळे सुहासभैयांच्या पाठीशी उभे राहणे आमचे नैतिक कर्तव्य आहे. गेल्या पाच वर्षांत अनिलभाऊंनी आम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून चांगली मदत केली होती. त्यामुळे आम्ही सुहास बाबर यांना जास्तीत मताधिक्य देणार आहोत असे प्रतिपादन आटपाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष जयदीप भोसले यांनी केले.

यावेळी बोलताना महायुतीचे उमेदवार सुहास बाबर म्हणाले, कै. मोहनकाका भोसले यांच्या पश्चात जयदीप भोसले यांनी दिलेला पाठिंबा मोलाचा आहे. आगामी काळात नेलकरंजी- परिसरात उर्वरीत विकास कामांना न्याय देऊ.  जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील म्हणाले की, जयदीप भोसले यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेला निर्णय शिवसेनेचे बळ वाढविणारा आहे. पाठिंबा देणाऱ्या सर्व कार्यकत्यांचा योग्य सन्मान केला जाईल.