बेकायदा दारू विक्रेत्यास अटक!

अलीकडच्या काळात अवैध धंदे बेफानपणे चालू आहेत. खरसुंडी (ता. आटपाडी) येथे बेकायदा देशी दारूची विक्री करणाऱ्या प्रकाश दत्ता जाधव (वय २६) याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून १ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी, खरसुंडी येथील लोहार गल्लीतील जीवा किराणा स्टोअर्सच्या पाठीमागे मोकळ्या जागेत प्रकाश जाधव हा बेकायदा दारू विक्रीसाठी बाळगून थांबला होता. पोलिसांना माहिती मिळताच छापा मारला. तेव्हा त्याच्याकडे दारूच्या २९ बाटल्या व रोख ५४० रुपये, असा १ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल आढळला. पोलिस कमर्चारी शंकर सुतार यांनी त्याच्याविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.