आता लाँच झाला AI सॉफ्टवेअर इंजिनिअर..

सध्या जगभरात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. एआयमुळे जगभरात अनेकांच्या नोकऱ्या जाणार असल्याचे बोलले जात आहे. आता अमेरिकेली एका स्टार्टअप कंपनीने डेविन नावाचा एक एआय सॉफ्टवेअर इंजिनिअर तयार केला आहे.

यामुळे जगभरातील सॉफ्टवेअर इंजिनिअरांच्याही नोकऱ्या कमी होणार असा दावा केला जात आहे. हे एक नवीन AI टूल आहे, हे टूल अमेरिकन एआय लॅब कॉग्निशनने तयार केले आहे. हा जगातील पहिला एआय सॉफ्टवेअर इंजिनीअर असल्याचा कंपनीचा दावा आहे. कोडिंग, वेबसाइट आणि कोडिंग प्रोग्रामरची अनेक कामे तो सहजपणे करू शकतो. तो एआय इंजिनिअर त्याच्या सहकाऱ्यांनाही मदत करणार आहे.

तो एक सुपर कुशल AI इंजिनिअर आहे. यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाणार का प्रश्न उपस्थित होतं आहे. तो टीमसोबत मिळून काम करेल आणि इंजिनिअरांना मदत करेल. मात्र, गरज भासल्यास संपूर्ण प्रोग्रॅमचे काम एकटा करू शकणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, तो विना थकताथ आपल्या साथीदारांना मदत करू शकतो. याशिवाय, कठीण समस्या सोडवण्यासही मदत होऊ शकते. अनेक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे साध्य करण्यात मदत होऊ शकते. एका सुप्रसिद्ध मोठ्या कंपनीने घेतलेल्या अभियांत्रिकी मुलाखतीत तो उत्तीर्ण झाला आहे.

डेव्हिन नावाचा AI सॉफ्टवेअर इंजिनिअर अनेक फिचरसह येतो आणि अनेक कठीण कार्ये सोडवू शकतो. हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये कोडींग, डीबगिंग सारखी कामे करू शकते. डेव्हिनमध्ये मशीन लर्निंग अल्गोरिदम वापरण्यात आले आहे, यामुळे ते सतत शिकत राहते आणि त्याच्या कामात सुधारणा होते.सध्या बाजारात अनेक एआय प्लॅटफॉर्म आले आहेत.यात विविध फिचर आहेत. ChatGPT च्या मदतीने वापरकर्ते कंटेंट लिहिण्यासाठी मदत घेऊ शकतात. प्लॅटफॉर्म इत्यादींच्या मदतीने फोटो आणि व्हिडीओ तयार केले जाऊ शकतात. गुगलने आपले जेमिनी देखील लॉन्च केला आहे.