लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र सद्गुरू बाळूमामा देवालय आदमापूर यांचा वार्षिक भंडारा उत्सव दिनांक ३० मार्च ते ७ एप्रिल २०२४ अखेर संपन्न होत आहे.त्यानिमित्ताने मंदिर, शिखर व मंदिर परिसराची स्वच्छता करण्यासाठी १८ मार्च ते २० मार्च पर्यंत तीन दिवस मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
यावर्षी पारंपरिक पद्धतीने यात्रा भरणार असून, त्याची तयारी व नियोजन सुरू आहे. मंदीर व परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदीरातील दर्शन सेवा बंद करावी लागणार आहे. त्यामुळे तीन दिवस दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मंदिराच्या प्रशासकीय समिती सदस्य रागीणी खडके व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे.