इचलकरंजी महापालिका कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप..

येथील महापालिकेच्या विविध विभागाकडील कर्मचाऱ्यांना प्रदीर्घ कालावधीनंतर गणवेश वाटप सुरू केले आहे.आरोग्य, अग्निशमन तसेच उद्यान विभागाकडील ७०० पुरुष आणि २३९ महिला कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्यात येत आहे. महिला सफाई कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ६ साडी आणि पुरुष कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी प्रत्येकी ३ ड्रेससाठी ८ मीटर कापड दिले जात आहे.

महापालिका झाल्यानंतर प्रथमच गणवेश वाटप करण्यात येत आहे. याबाबतचा आदेश आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिला होता. याबाबतची निविदा प्रक्रिया राबवली होती. त्यानंतर गणवेश वाटपची प्रक्रिया सुरू केली आहे.