Raju Shetti : मोदींचे अनेक निर्णय लोकशाहीला घातक…

‘मोदी सरकारने घेतलेले अनेक निर्णय हे चुकीचे असून देश व लोकशाहीला घातक ठरणारे आहेत. एकीकडे शेतकरी,गोरगरीब कामगारांची पिळवणूक होत असताना हे सरकार उद्योगपती धार्जिण्या पद्धतीने काम करत आहे.” अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

सूसगाव येथे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातील मतदारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी हि टिका केली. याप्रसंगी अमरसिंह कदम, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाशतात्या बालवडकर, पुणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर बांगर, बाप्पूसाहेब कारंडे, ॲड. योगेश पांडे, सुदिन खोत, दिलीप बालवडकर, नारायण चांदेरे, चंद्रकांत पाटील, अशोक बालवडकर, संदीप बालवडकर, हनुमंत बालवडकर, उमेश सत्रे, अमित कुडले, मारुती गोरडे, काशिनाथ दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

‘हे सरकार शेतकरी, कष्टकरी यांच्या विरोधातील असून उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ केली. परंतु शेतकऱ्यांची छोटीशी कर्जे माफ करण्यासाठी व नवीन योजना आणून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मात्र कुचकामी ठरलेले आहे. असेही शेट्टी म्हणाले. सरकारी क्षेत्रातील वाढते खाजगीकरण, वाढती महागाई यावरही त्यांनी यावेळी लक्ष वेधले.