किणीत हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धा ३० नोव्हेंबरला

हातकणंगले तालुक्यातील किणी येथे प्रतिवर्षी दिवाळीदरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धा परतीचा पाऊस आणि निवडणूक आचारसंहितेमुळे लांबणीवर टाकल्या आहेत.३५ व ६० किलो वजन गटाखालील या स्पर्धा आता ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती हिम्मत बहाद्दूर विजयसिंह चव्हाण यांनी दिली. हीरकमहोत्सवी वर्ष पार केलेल्या किणी विद्यार्थी मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिवाली क्रीडा महोत्सवांतर्गत हिम्मतबहाद्दूर चषक कबड्डी स्पर्धांचे आयोजन केले जाते.