IPL 2024ला चार दिवस बाकी असताना मुंबईच्या स्कॉडमध्ये बदल!

मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2024 पूर्वी एक महत्वाचा बदल पाहायला मिळत आहे. इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाची सुरुवात 22 मार्च रोजी होत आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ दुखापतीमुळे आगामी हंगामात मुंबईसाठी खेळू शकणार नाहीये.

वेगवान गोलंदाज जेसन बेहरनडॉर्फ याची दुखापत मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बाब बनली होती. पण सोमवारी त्याच्या जागी ल्यूक वूड (Luke Wood) याला संघात घेतले गेले. इंग्लिश वेगवान गोलंदाजासाठी मुंबई फ्रँचायझीने 50 लाख रुपये खर्च केले आङेत. 28 वर्षीय वूड अद्याप एकही आयपीएल सामना खेळला नाहीये.

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून वूड ताफात्या सामील झाल्याची माहिती सर्वांना दिली. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये मुंबई इंडियन्सने लिहिले की, ल्यूक वूड दुखापतग्रस्त जेसन बेहरनडॉर्फच्या जागी संघात सामील झाला आहे. जेसन लवकर ठीक होईल अशी अपेक्षा. मुंबईच्या या पोस्टवर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

डावखुरा वेगवान गोलंदाज वूड नुकताच पाकिस्तान सुपर लीग 2024चा भाग रोहिता. बाबर आझम याच्या नेतृत्वातील पेशावर जल्मी संघाकडून तो खेळत होता. एलिमिनेटर दोनमध्ये या संघाचे अभियान संपुष्टात आले. वूडने पीएसएलच्या काही सामन्यांमध्ये प्रभावी गोलंदाजी केली. तो संघासाठी किफायतशीर गोलंदाजी करतोय.

पण सोबतच वेगवेगळ्या परिस्थितीनुसार स्वतःच्या गोलंदाजीत बदल देखील करून घेऊ शकतो. त्याने आतापर्यंत एकूण 140 टी-20 सामन्यांमध्ये 147 विकेट्स घेतल्या आहेत. तर 62 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 137 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.मुंबईला आगामी हंगामात आपल्या अभियानाची सुरुवात 24 मार्च रोजी करायची आहे. हंगामातील पहिला सामना मुंबई संघ गुजरात टायटन्सविरुद्ध खेळेल.

मागच्या वर्षी गुजरातचा कर्णधार असणारा हार्दिक पंड्या आगामी हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसेल. तर मुंबईसाठी पाच आयपीएल ट्रॉफी जिंकणारा रोहित शर्मा हार्दिकच्या नेतृत्वात खेळणार आहे. चाहत्यांसाठी नक्कीच हा एक वेगळा अनुभव असेल.