महाराष्ट्रातील काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत सोलापूरातून प्रणिती शिंदे, पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरहून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

नंदुरबार – गोवाळ पाडवी, अमरावती – बळवंत बसवंत वानखेडे, नांदेड – वसंतराव बळवंतराव चव्हाण,

पुणे – रविंद्र हेमराज धंगेकर, लातूर – डॉ. शिवाजीराव काळगे, सोलापूर – प्रणिती शिंदे, कोल्हापूर – शाहू शहाजी छत्रपती