हुपरी येथे शिवसेना युवा सेनेच्यावतीने भव्य मोटारसायकल रॅली उत्साहात 

शिवसेना युवा सेना आयोजित युवा विजय महाराष्ट्र दौरा राज्य भरात संपन्न होत आहे. त्या अनुषंगाने दौऱ्याचा चौथा टप्पा कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार २४ मार्च २०२५ रोजी आयोजित केला होता. त्या अंतर्गत युवा सेनेची भव्य भगवी मोटर सायकल रॅली आयोजित करण्यात आली. सदरची रॅली पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, यळगुड, मार्गे शिवसेना शहर कार्यालय हुपरी या मार्गावर आयोजित करण्यात आली. या रॅलीमध्ये अनेक युवा सैनिक यामध्ये सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून या सभेत सुरुवात झाली.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीत भगवा फडकवण्याचे निश्चित केले. मुरलीधर जाधव यांनी देखील तरुण पिढीने युवा सेनेमध्ये सक्रिय होऊन हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करून ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करून भगवा कायम फडकत ठेवावा असे आवाहन केले. किरणजी साळी यांनी तरुण पिढीला मार्गदर्शन केले. शिवाजी जाधव यांच्या पाठीशी राहण्यासाठी उत्साहित केले. शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले. सदर दौऱ्याची सांगता शिवसेना शहर कार्यालय हुपरी येथे पदाधिकारी संवाद सभेने झाली.