३० मार्चपासून बाळूमामा भंडारा उत्सवास प्रारंभ

महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, गोवा, अन्य राज्यातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड ) येथील सद्गुरु बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव शनिवार ता. ३० मार्च ते मंगळवार ता. ७ एप्रिल अखेर संपन्न होत आहे. या भंडारा उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार ता. ३० मार्च रोजी सकाळी ७ वाजता विणापूजन होऊन हरिनाम सप्ताहास, भंडारा उत्सवास प्रारंभ होईल. नित्याचे कार्यक्रम, पहाटे ४ ते ५ श्रींची समाधी पूजन, सकाळी ५ ते ६ काकड आरती, दुपारी ४ते ५:३० हरिपाठ, सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, सायंकाळी सात वाजता आरती, रात्रौ ९ ते ११ हरिकिर्तन, ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हरिजागर होणार आहे.