फलटण – दहिवडी – मायणी – विटा ते तासगाव बायपास रस्ता मंजूर!

फलटण – दहिवडी – मायणी – विटा ते तासगाव बायपास रस्ता हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजितसिंह यांना पत्राद्वारे कळवले आहे.

नितीन गडकरी यांचा फलटण येथे जाहीर कार्यक्रम होता. त्यावेळी खासदार रणजितसिंह यांनी या रस्त्याची मागणी केली होती. त्यावेळी गडकरी यांनी हा रस्ता मंजूर करणार असल्याची घोषणा केली होती. आता याचे टेंडर सुद्धा प्रकाशित करण्यात आले आहे.

‘एनएच १६०’ वर होणार्‍या या बायपास रस्त्यासाठी अंदाजे ३७६.३२ कोटी रूपयांचा खर्च येणार आहे. या रस्त्याची लांबी ४० किलोमीटर असून २४ महिन्यांमध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे. हा रस्ता झाल्याने फलटण, दहिवडी, मायणी, विटा व तासगाव येथून जाणार्‍या वाहनांची मोठी सोय होणार आहे.