आमदार सुहास भैया बाबर यांनी खानापूर आटपाडी मतदारसंघात प्रचंड मताधिक्याने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. विट्यात त्यांनी त्यांच्या आमदारकीचे सेलिब्रेशन आपल्या बाल मित्रांच्या बरोबर साजरे केले. आमदार सुहास बाबर यांचे बालपण हे विट्याच्या देशचौगुले प्राथमिक शाळेत आणि पुढे माध्यमिक शिक्षण हे महात्मा गांधी विद्या मंदिरात पूर्ण झाले. सुहास आणि बंधू अमोल यांना मित्र जमविण्याचा चांगलाच छंद आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना नेता आणि कार्यकर्ता असे कधी वाटलेच नाही. बाबर बंधू हे प्रत्येकाशी मित्रासारखेच वागतात.पण हीच मैत्री कशी सोबतीला राहते हे या विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आले.
सुहास बाबर त्यांच्या प्रचाराच्या काळात नेहमी म्हणायचे मला गट तट विसरून अनेक अदृश्य हात मदत करत आहेत.त्या हातामध्ये त्यांचे बालपणीचे मित्र देखील होते हे उघड झाले आहे. आमदार सुहास भैया बाबर यांच्या मित्रांचे विजयी सेलिब्रेशन झाले. तेव्हा श्रेयस उद्योग समूहाचे ॲड.संदीप मुळीक, कुलदीप पाटील, विघ्नहर्ता ग्रुपचे भालचंद्र कांबळे यांच्यासह रवी जाधव, प्रशांत तारळेकर, अमित म्हेत्रे, देवेंद्र धर्माधिकारी, नरेश पवार, प्रकाश बागल, महेश तारळेकर,मनोज पेटकर,
शरद बागल, राहुल टेके, संदीप सुतार, प्रशांत कूपाडे, सचिन रसाळ, डॉ. गणेश पाडळकर यांचा उत्साह अपार होता. मित्राच्या आमदारकीचे निमित्त असले तरी भूतकाळातील आनंदाचे क्षण प्रत्येकाच्या ओठांवर तरंगत होते. सुहास भैया बाबर हे मैत्री पाळताना जात-पात, राजकीय हवे दावे पाहत नाहीत. त्यांचे सारेच मित्र वेगळ्या क्षेत्रात नावाजलेले काम करत आहेत. तरीदेखील छोट्यातल्या छोट्या मित्राला ते कधीही विसरत नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे.