श्री महालक्ष्मी वधू वर केंद्र हुपरी यांच्या वतीने सर्वधर्मीय वधूवर मेळावा रविवार दि. ३१ मार्च रोजी हुपरी येथील सपाटे मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये मराठा, जैन, लिंगायत, सुतार, लोहार, कुंभार, साळी, शिंपी, न्हावी, गवळी, रंगारी, गुरव, परीट, महार, मांग, धनगर व मराठा उपजातीतील सर्व वधू-वरांची नोंदणी करून उमेदवारांचा परिचय करून देण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक संभाजीराव शेटके, मनसे शहर प्रमुख दौलतराव पाटील, हपरी उपनगराध्यक्ष गणेश वाईगडे, नगरसेवक सुभाषराव ससे आदी उपस्थित राहणार आहेत.
हुपरी येथे ३१ मार्चला रोजी सर्वधर्मिय वधूवर मेळावा!
