सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्याने सांगलीतील जागा वाटपाचा तिढा वाढलेला दिसून येत आहे. या जागेचा तिढा सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी बैठका देखील घेतल्या जात आहेत.
परंतु या बैठकांना आता काँग्रेस कंटाळली आहे. सांगलीची जागा काँग्रेस सोडायला तयार नाही. सांगलीतील जागेबाबतचा वाद कमी न झाल्यास काँग्रेस वेगळी चूल मांडण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सांगलीच्या जागेबाबत उद्धव ठाकरे हे घाई करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली असून काँग्रेसने देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध ठाकरे गट आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही.