‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज……

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ हा चित्रपट सतत चर्चेत असतो. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.अशा परिस्थितीत प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रेक्षकांचा उत्साह पाहून चित्रपटाच्या निर्मात्यांनी आज ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाचा ट्रेलरमध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत.

या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, आलिया एफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. Bade Miyan Chote Miyan trailer या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे. वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे त्याचे निर्माते आहेत. 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.