तयारीला लागा! UGC NET परीक्षेची अर्जप्रक्रिया लवकरच सुरू होणार!

UGC NET ची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी  अर्थात UGC NET 2024 साठी नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. अशी माहिती यूजीसीचे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, नोंदणी प्रक्रिया एकदा सुरु झाल्यानंतर उमेदवार यूजीसी नेटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) चे अध्यक्ष ममिदला जगदीश कुमार यांनी बुधवारी जाहीर केले की जून 2024 सत्रासाठी UGC राष्ट्रीय पात्रता चाचणी (UGC NET 2024) नोंदणी पुढील आठवड्यात सुरू होण्याची अपेक्षा आहे. एकदा अर्जप्रक्रिया सुरु झाल्यानंतर उमेदवार यूजीसी नेटच्या ugcnet.nta.nic.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करू शकतात.  

UGC NET जून 2024 साठी नोंदणी कशी करावी? (How To Apply)

स्टेप 1 : सर्वात आधी तुम्हाला ugcnet.nta.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. 

स्टेप 2 : यानंतर होम पेजवरील नोंदणी लिंकवर क्लिक करा.

स्टेप 3 : लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला अर्ज आणि फी भरावी लागेल.  

स्टेप 4 : अर्ज फी भरल्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करा.

स्टेप 5 : त्यानंतर तुमचा अर्ज डाऊनलोड करा आणि तुम्हाला हवी असल्यास त्याची प्रिंटआउट काढा. जेणेकरून भविष्यात ही प्रिंट आऊट तुम्हाला उपयोगी पडेल. 

UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. NET वर्षातून दोनदा जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. सध्या NET स्कोअर (a) कनिष्ठ संशोधन फेलोशिप (JRF) पुरस्कार आणि (b) पदव्युत्तर पदवी असलेल्यांसाठी सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्तीसाठी पात्रता म्हणून वापरला जातो.