जवळपास दोन दशकाच्या राजकीय वनवासानंतर गोविंदा पुन्हा राजकारणात सक्रिय झाला आहे. 2004 साली गोविंद जायंट किलर ठरला होता. त्याने भाजपचे राम नाईक यांना पराभूत केले होते. पण त्यानंतर तो अचानक राजकारणापासून दूर गेला. त्याने चित्रपटातही काम करणे कमी केले. पण आता हा हिरो नंबर 1 पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. दोन दशकांच्या राजकीय वनवासानंतर त्याने गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. शिवसेनेच्या तिकीटावर गोविंदा मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविण्याची दाट शक्यता आहे. गोविंदा हा धनकुबेर आहे, तो इतक्या संपत्तीचा मालक आहे.
बॉलिवूडचा राजाबाबू पुन्हा राजकारणात सक्रीय झाला आहे. मुंबईतून त्याला लोकसभा तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे. तो गेल्या काही वर्षांपासून राजकारण आणि सिनेमांपासून दूर होता. Myneta.info वरील माहितीनुसार, 2004 मध्ये त्याने निवडणूक आयोगाला शपथपत्र सादर केले, त्यातील आकडीवर नजर टाकल्यास गोविंदाची एकूण नेटवर्थ 14 कोटी रुपये इतकी होती. आता 20 वर्षानंतर या संपत्तीचे मूल्य जवळपास 150 कोटींच्या घरात पोहचते.
