राष्ट्रवादी कॉँग्रेस व शिवसेनेत पडलेली फूट, निवडून आणण्यापेक्षा कुणाला पराभूत करायचे, यासाठी होणारे मतदान हा इतिहास पाहता कोल्हापूर मतदारसंघात महायुतीला जागा राखण्याचेच खरे आव्हान असेल.सद्यःस्थितीत ही जागा महायुतीत शिवसेनेकडे आहे. खासदार प्रा. संजय मंडलिकच महायुतीचे उमेदवार आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा बऱ्याच कालावधीनंतर काँग्रेसला मिळाली आहे. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची उमेदवारी निश्चित झाली आहे आणि संपर्क व प्रचाराच्या पातळीवर आघाडीने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.
महाविकास आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी जाहीर. प्रचाराला प्रारंभजिल्ह्यातील मोठे राजकीय गट महायुतीकडे राहण्याची शक्यता महाविकास आघाडीचा सर्व घटकांची मोट बांधून नियोजनबद्ध प्रचारावर भर कोल्हापूरची अस्मिता म्हणून श्रीमंत शाहू महाराज यांची उमेदवारी तर महायुतीकडून मोदींचे काम व हिंदुत्वावर दिला जाणार भर