केद्रीय मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर शिंदे गटातील विद्यमान खासदारांचे धाबे दणाणले आहेत. विद्यमान आमदार पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच संधी द्या, हट्ट धरू नका, अशी सूचना अमित शाह यांनी केल्यानंतर राज्यातील शिंदे गटाच्या खासदारांना लोकसभेचे तिकीट मिळणार नाही, अशी जवळपास शक्यता दाट झाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन्ही विद्यमान खासदारांची हीच अवस्था झाली असून, आपल्या उमेदवारीसाठी अक्षरशः आटापिटा आणि धडपड करण्याची वेळ आली आहे.