सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपाने राम सातपुते यांना तर काँग्रेसनेप्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दोन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.दरम्यान, राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांना त्यांच्या मालमत्तेचा हिशेब देण्याचे आव्हान दिले होते. सातपुते यांच्या या आव्हानाला आता आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रचार सभेत बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या, घरातून चांगले संस्कार मिळावे लागतात, ते तुमच्याकडे नाहीत, ८३ वर्षांचे असूनही पवार साहेब व माझे वडील महाराष्ट्र पिंजून काढतात, तुम्हाला लढायचं असेल तर माझ्याशी लढा, मी उभी आहे, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, अशा शब्दांत प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता राम सातपुतेंना सुनावलं.