रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी, प्रोबस क्लब, प्रोबस महिला क्लब, ज्येष्ठ नागरिक संघ, रोटरी ॲन्स
इचलकरंजीतर्फे ज्येष्ठ नागरिक संमेलनाचे आयोजन केले आहे.
संमेलन रविवारी (ता. ३१) श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात होणार आहे. उद्घाटन मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव विकास खारगे यांच्याहस्ते आहे. रोटरीचे प्रांतपाल नासिर बोरसदवाला अध्यक्षस्थानी असतील. पहिल्या सत्रात डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांचे ‘आनंदी जीवन’ याविषयी मार्गदर्शन करतील. दुपारी यूट्यूब फेम डॉ. संजय करमळकर (अहमदनगर) यांचा आयुष्यातील ‘आनंदाच्या वाटा’ हा विनोदी कार्यक्रम होईल. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अनिल मडके (सांगली) यांचे आरोग्य आणि ज्येष्ठ नागरिक यावर मार्गदर्शन, शेवटच्या सत्रात उमरसाब बेळगावी यांचा गीत व संगीतमय कार्यक्रम होईल.
इचलकरंजीत रविवारी ज्येष्ठ नागरिक संमेलन
