‘या’ तारखेपासून कॉल फॉरवर्डिंग सुविधा होणार बंद,

सरकारनं कॉल फॉरवर्डिंग बंद करण्याच्या सूचना दूरसंचार कंपन्यांना (Telecom companies) दिल्या आहेत. येत्या 15 एप्रिलपासून ही सेवा बंद होणार आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी सरकारनं यासंदर्भात सूचना केल्या आहेत. ही सुचना USSD वर आधारीत कॉल फॉरवर्डिंगसाठी आहे. 15 एप्रिलपासून कॉल फॉरवर्डिंग सेवा बंद होणार आहे.

मात्र, ही सेवा बंद करताना यासाठी पर्यायी सेवा उपलब्ध करुण देण्याच्या सूचना देखील सरकारमं दूरसंचार कंपन्याना दिल्या आहेत. दूरसंचार कंपन्यांकडून USSD आधारित अनेक सेवा प्रदान केल्या जातात. यामध्ये IMEI सुविधेपासून ते बॅलन्स चेक करण्यापर्यंतच्या सुविधांचा समावेश आहे. यातीलच एक सेवा म्हणजे कॉल फॉरवर्डिंगची सुविधा. मात्र, ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.