सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे उमेदवार (BJP Candidate) राम सातपुते यांच्यात लढत होत आहे. दरम्यान, सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात पहिला डाव टाकला असल्याचे पाहायला मिळत आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघांचे माजी आमदार दिलीप माने हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. दुपारी एक वाजता मुंबईतल्या टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये परतत असल्याने काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेना याचा फायदा होणार असल्याची शक्यता आहे.
दिलीप माने हे जवळपास 25 वर्ष काँग्रेसमध्येच होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश करत विधानसभा निवडणूक लढवलेली होती. मात्र, या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राजकारणात कुठल्याही पक्षात सक्रिय नव्हते. परंतु, आत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने काँग्रेसमध्ये पुन्हा परतत आहेत.