सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत धुसफूस

लोकसभा निवडणुकीचं वारं वाहतंय. अशात काही जागांवरून महाविकास आघाडीत तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. सांगलीतील जागेवरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. ठाकरे गटाने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगलीतून लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे.

पण यामुळे सांगलीतील स्थानिक काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनी दिल्लीत जात पक्षश्रेष्ठींपुढे आपली नाराजी व्यक्त केली आजही काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. यावर दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.