वाळवा तालुक्यातील ढवळी (ता. येथील नागाव रस्त्यावरील इनाम नावाच्या शेत शिवारात दोन पिलांसह बिबट्या असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बावची, गोटखिंडी, नागाव, पोखर्णी, ढवळी परिसरात बिबट्या दिसल्याची ग्रामस्थांत चर्चा सुरू असते.
ढवळी परिसरात बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. शेतकऱ्यांना शेतमजूर मिळणे मुश्कील झाले आहे. बिबट्या मादी व दोन पिल्ले असल्याचे नागरिकांनी पाहिले आहे. त्यामुळे ग्रामस्थ शेतात जाण्यासाठी कचरत आहेत. दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे.