दिघंची (ता. आटपाडी) येथे पोलिसांनी गावठी हातभट्टीवर छापा टाकत देशी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे आठशे लिटर रसायन जप्त करून हातभट्टीचा अड्डा उद्ध्वस्त केला. दरम्यान, यावेळी पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पलायन केले.
कारवाईत ३३ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिघंचीच्या हद्दीत ढोलेमळ्याजवळील सिद्धोबा शेतात, दिघंची ते इटकी जाणारे रोडजवळ राजेवाडी तलाव येथून येणाऱ्या कॅनॉलच्या बाजूला ओढा पात्रात संशयित मारुती बुधावले (रा. दिघंची) हा त्या ठिकाणी बेकायदा गावठी दारू तयार करीत होता. पोलिसांनी छापा टाकत हातभट्टी उद्ध्वस्त केली. यावेळी गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, असा एकूण ३३ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.