महाविकास आघाडीत सांगली लोकसभा मतदारसंघाचा वाद ताणलेला असताना, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आज शुक्रवारी (ता. ५) सांगली मुक्कामी येत आहेत. ‘मी चार दिवसांसाठी येतोय,’ असे त्यांनी जाहीर केले असून, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत.
शिवसेना ॲक्शन मोडवर आली असून, राऊत यांचे हेलिकॉप्टर सांगलीत उतरण्याआधी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीचा तिढा सुटलेला असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.