या राजकारण्यांवर…., सोनू सूद याचं लक्षवेधी वक्तव्य

अभिनेता सोनू सूद याला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. अभिनेता कायम त्याच्या वक्तव्यांमुळे आणि कामामुळे चर्चेत असतो. दरम्यान, सोनू सूद राजकारणात प्रवेश करेल अशा चर्चांनी देखील जोर धरला होता. पण आपण कोणत्याच पक्षात प्रवेश करणार नाही… असं वक्तव्य करत अभिनेत्याने रंगणाऱ्या चर्चांना पूर्णविराम लावला होता. पण आता नुकताच अभिनेत्याने राजकारणी व्यक्तींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सोनू सूद पुन्हा चर्चेत आला आहे.सांगायचं झालं तर, नुकताच  अभिनेत्याने एक्सवर आस्क सोनू सूद सेशनच्या  माध्यमातून चाहत्यांसोबत संवाद साधला. सेशन दरम्यान एका नेटकऱ्याने अभिनेत्याला ‘भारतात कोणते बदल होण्याची गरज आहे?’ असा प्रश्न विचारला… या प्रश्नाचं अभिनेत्याने दिलेलं उत्तर सध्या चर्चेत आहे.

नेटकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘राजकाण्यांच्या भरवश्यावर राहू नका… सामान्य लोकांनीही जीवन बदलण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे…’ सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनू सूद याची चर्चा रंगली आहे.