कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत कागल तालुक्यातील महायुतीतील तीन गट एकत्र येऊन जर मताधिक्य मिळवले तर साक्षात परमेश्वर आला तरी संजय मंडलिक यांचा पराभव होऊ शकत नाही, असा ठाम विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कापशी येथे हुतात्मा चौकात झालेल्या प्रचारसभेत मुश्रीफ यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कान पिचक्या दिल्या आहेत. विधानसभेचे राजकारण लोकसभेवेळी काढून मंडलिक यांची अडचण करू नका, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला आहे.
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ कागल तालुक्यातील कापशी येथे मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात पालकमंत्री मुश्रीफ यांनी विरोधकांना लावलेले टोले, आणि महायुतीतील स्वकीयांचे काढलेले चिमटे चांगलेच चर्चेचे विषय बनले आहेत.