इचलकरंजीत रमजान ईदसाठी बाजार पेठा सजल्या…..

रमजान ईद हा मुस्लिम बांधवांचा पवित्र सण मानला जातो. हा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. म्हणजेच हा सण 11 एप्रिल गुरुवारच्या दिवशी साजरा होणार आहे आणि या उत्सवासाठी मुस्लिम बांधवांनी बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लगबग सुरू केलेली आहे.

ईद दिवशी करण्यात येणाऱ्या शीरखुर्मासाठी आवश्यक साहित्यांचे स्टॉल शहरात उभारण्यात आले आहेत. ड्रायफ्रूट्स चे भाव वाढल्याने सर्वसामान्य माणसाला महागाईचा चटका बसला आहे. रमजान ईद साठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तूंची दुकाने सजलेली आहेत. काही दिवसांपासून ग्राहकांची गर्दी वाढल्याने बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे.