गुढीपाडवा झाला गोड, सर्वसामान्यांना मोठा दिलासा

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खाद्यतेलाने आनंदवार्ता आणली आहे. खाद्यतेलाच्या किंमती घसरल्या आहेत. केंद्र सरकारने गेल्या दोन वर्षांपासून खाद्यतेलाचे दाम आटोक्यात आणण्यासाठी अनेक उपाय योजना केल्या आहेत. लहरी निसर्गाने त्यात खुटी ठोकली असली तरी आयातीने सरकारला तारले आहे. गेल्या एक वर्षांपासून खाद्यतेलाच्या आघाडीवर सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. देशातील खाद्यतेल-बियाणे बाजारात सर्व तेलाच्या किंमतीत बदल दिसून आला. मोहरी, शेंगदाणे, सोयाबीन तेल, तेलबिया, कच्चे पाम तेल, पामोलिन तेल, कापसाच्या तेलात तेजीचे सत्र दिसून आले.