नुकताच रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर हे द कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचले. विशेष म्हणजे यावेळी शोमध्ये रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह देखील उपस्थित होती.यावेळी कपिल शर्माने शोमध्ये आलेल्या रितिका सजदेहला विचारले की, स्टेडियममध्ये असे कधी झाले आहे का? की, रोहित शर्मा लवकर आऊट झाला आणि अनुष्का शर्माने त्यानंतर चिडवले.हेच नाही तर त्यानंतर तुमच्या दोघींमध्ये वाद झाले.
यावर रितिका सजहेद म्हणाली की, मुळात म्हणजे ज्यावेळी रोहित बॅटिंग करतो, त्यावेळी मी कोणासोबतच बोलत नाही. यामुळे भांडणे होत नाहीत.यावेळी परत कपिलने विचारले की, जेंव्हा रोहित शर्मा आऊट होतो तेंव्हा काय करते? यावर रितिका सजदेह म्हणाली की, मी इतर मित्रांना सपोर्ट करते.कायमच रोहित शर्माला स्टेडियममध्ये सपोर्ट करण्यासाठी रितिका सजदेह ही पोहचते. अनुष्का शर्माही विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच येते.