Lakshmi Pujan 2024 Muhurat दिवाळीतील लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त, संपूर्ण पूजा पद्धत

हिंदू धर्मात आश्विन महिन्यातील अमावस्या तिथी दिवाळी सण साजरा केला जातो. अमावस्या तिथीच्या प्रदोषकाल आणि निशीथ काल मध्ये देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. प्रदोष काल निशीथ काल 31 ऑक्टोबर 2024 गुरुवारी रोजी असेल.अशात दिवाळीला लक्ष्मी पूजनाचे शुभ मुहूर्त या दिवशी आहे. तसे तर उदया तिथीप्रमाणे दिवसाची पूजा आणि व्रत पाळले जातात.

01 नोव्हेंबर रोजी दिवाळी पूजेसाठी शुभ मुहूर्त –

1 नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन करायचे असेल तर या दिवसाचा शुभ मुहूर्त जाणून घ्या

  • लक्ष्मीपूजनाची वेळ- संध्याकाळी 05.36 ते 06.16 पर्यंत असेल
  • प्रदोष कालचा मुहूर्त- संध्याकाळी 05:36 ते 08:11 पर्यंत असेल

पूजा पद्धत

संध्याकाळी पुन्हा स्नान करा.

लक्ष्मीजींच्या स्वागताच्या तयारीसाठी घराची साफसफाई केल्यानंतर भिंतीला चुना किंवा गेरूने रंग द्या आणि लक्ष्मीजींचे चित्र काढा. (देवी लक्ष्मीचा फोटोही लावता येईल.) जेवणात स्वादिष्ट पदार्थ, गोड फळे, आणि अनेक प्रकारच्या मिठाई तयार करा. लक्ष्मीजींच्या चित्रासमोर एक चौरंग ठेवा आणि त्यावर मौली बांधा.

त्यावर मातीची गणपतीची मूर्ती बसवावी. त्यानंतर श्रीगणेशाला तिलक लावून त्याची पूजा करावी. आता चौरंगावर सहा चौमुखी आणि 26 छोटे दिवे लावा. त्यात तेल वात टाकून दिवे लावा.नंतर पाणी, मौली, अक्षता, फळे, गूळ, अबीर, गुलाल, उदबत्ती इत्यादींनी पूजा करावी.

पूजेनंतर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक दिवा लावा. एक छोटा आणि चार बाजू असलेला दिवा ठेवा आणि खालील मंत्राने लक्ष्मीची पूजा करा.