सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांची ताकद आणखी वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत परंपरागत विरोधक असलेल्या नेत्याने थेट पाठिंबाच जाहीर केलाय. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. पण वंचित आणि एमआयएम यांच्या उमेदवारीमुळे मतदारसंघाचं गणित बदलणार होतं.
वचिंत आणि एमआयएमचा फटका प्रणिती शिंदे यांनाच बसण्याची शक्यता आहे. पण आता माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी लोकसभेसाठी आमदार प्रणिती शिंदेना पाठिंबा जाहीर केला. आडम मास्तर यांच्या पाठिंब्यामुळे प्रणिती शिंदे यांची ताकद नक्कीच वाढणार आहे.