आज इचलकरंजीत मूक पदयात्रेने बलिदान मासची सांगता

स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी देश तसेच धर्मासाठी बलिदान दिले. त्यांच्या बलिदानाचे स्मरण कायम राहण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना दरवर्षी फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाने पकडून केले ते त्यांचा दुर्दैवी मृत्यूपर्यंत असा हा काळ असल्याने तो बलिदान मास म्हणून सर्वत्र पाळला जातो.

शहरातही गेल्या 17 वर्षापासून हा मास पाळला जात आहे. शहरातील विविध 200 चौकात छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यावर्षी अकरा मार्चपासून बलिदान मास सुरू झाला. याची सांगता आज सोमवारी 8 एप्रिल रोजी दुपारी चार वाजता मंगलधाम गणपती मंदिर येथून पदयात्रेने होणार आहे.