12वीनंतर थेट पोलीस व्हायचे मग आताच सुरु करा हि तयारी!

अनेकांचे स्वप्न हे पोलीस भरतीचे मनोमनी असतेच. त्यासाठी प्रत्येक विध्यार्थी हा अगदी मनापासून प्रयत्न देखील करीतच असतो. सरकारकडून पोलीस भरती या जाहीर करण्यात येतातच. तुम्हालाही जर बारावीनंतर पोलीस व्हायचं आहे तर मग हि तयारी तुम्ही कराच….बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक तरुण तरुणी पोलीस कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करीत असतात.

पोलीस होण्यासाठी प्रचंड मेहनत आणि अभ्यास करण्याची गरज असते. जर तुम्हालाही पोलीस कॉन्स्टेबल व्हायचं असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे बारावीनंतर तुम्हाला पोलीस भरतीचा अभ्यास करण्यात नक्कीच मदत होईल. चला तर जाणून घेऊया. 

पोलिसात नोकरी मिळविण्यासाठी पात्रता निकष 

पोलीस विभागात बारावीनंतर फक्त कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करता येतो. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार प्रथम भारताचे नागरिक असले पाहिजेत आणि त्यांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून 12वी उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असावेत. वेगवेगळ्या पदांसाठी कमाल वय असले तरी अर्जदारांचे किमान वय 18 वर्षे असावे. उंची किमान 168 सेमी असावी. राखीव उमेदवारांसाठी काही शिथिलता आहे. 

 बारावीनंतर या पदांवरही मिळते नोकरी 

पोलीस खात्यात बारावीनंतरच हवालदाराची नोकरी मिळेल, असे बहुतांश उमेदवारांना वाटते. पण आम्ही तुम्हाला सांगतो की बारावी उत्तीर्ण उमेदवारांना पोलिस खात्यात आणखी अनेक पदे मिळू शकतात. 12वी नंतर तुम्हाला कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, PSI आणि SI इत्यादी पदे देखील मिळू शकतात. पीएसआय आणि एसआय पदांसाठी ग्रॅज्युएशन आवश्यक असले तरी काही भरतींमध्ये 12वी पासची शैक्षणिक पात्रता मागितली जाते. 

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक 

बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल होण्यासाठी उमेदवाराला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. लोकसेवा आयोग प्रत्येक राज्यात पोलीस हवालदारांच्या भरतीसाठी पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा घेतो. PSC प्रत्येक राज्यातील कायद्याच्या अंमलबजावणीतील रिक्त पदांनुसार परीक्षा आयोजित करते. परीक्षेची अधिसूचना मुख्य रोजगार दैनिकांमध्ये प्रकाशित केली जाते. यानंतर जे लोक लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत उत्तीर्ण करतात ते पोलीस हवालदार बनू शकतात; एकदा, त्यांनी या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या की, त्यांना कठोर प्रशिक्षण कार्यक्रमातून जावे लागेल. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच ते पोलिस सेवेत रुजू होऊ शकतात.

हि कागदपत्रे नक्की हव्यात

  • उमेदवाराचे ओळखपत्र आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स
  • अर्जदाराची दहावीची मार्कशीट
  • अर्जदाराची बारावीची मार्कशीट
  • उमेदवार पदवीधर असल्यास गुणपत्रक
  • मुक्त विद्यापीठातून शिकत असल्यास गुणपत्रक
  • पद्वित्तीर्ण पदवी असल्यास गुणपत्रक
  • उमेदवाराने ITI/ डिप्लोमा केला असेल तर मार्कशीट
  • शाळा सोडल्याचा दाखला TC
  • शाळेत शिकत असल्यास बोनाफाईड प्रमाणपत्र
  • कास्ट सर्टिफिकेट
  • वयाचा पुरावा
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्यास EWS प्रमाणपत्र
  • महिलांसाठी 30 टक्के आरक्षणाचे प्रमाणपत्र
  • प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त असल्यास प्रमाणपत्र
  • अर्जदार खेळाडू असेल तर प्रमाणपत्र
  • होमगार्ड प्रमाणपत्र
  • वडील पोलीस असतील तर प्रमाणपत्र
  • माजी सैनिक असतील तर डिस्चार्ज कार्ड ओळखपत्र
  • माजी सैनिक असतील तर आर्मी एज्युकेशन प्रमाणपत्र