नांदणी- बरुर (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील चनबसप्पा रेवप्पा सलगरे (रा. सलगर वस्ती, बरूर) याने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नी व तिच्या प्रियकरावर कुऱ्हाडीने वार करून खून केला.या प्रकरणी मयत श्रीकांत अनिल नरोटे (वय २२, रा. नरोटे वस्ती, नांदणी ) याचे वडील अनिल नरुटे यांनी मंद्रूप पोलिसांत फिर्याद दिली असून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी चनबसप्पा सलगरे याला पत्नी व श्रीकांत या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा खूप दिवसांपासून संशय होता. यापूर्वी देखील त्या दोघांना समजावून सांगण्यात आले होते. पण, त्यांच्यातील जवळीकता कमी झालेली नव्हती. बुधवारी (ता. १०) दुपारी तीनच्या सुमारास संशयित आरोपी चनबसप्पा याने अनिता व श्रीकांत या दोघांना शेतात एकत्र पाहिले आणि त्याच्या रागाचा पारा चढला. त्याने कुऱ्हाडीने पत्नी अनिता व श्रीका…
