आ. डॉ. विनय कोरे यांनी रात्री आ. प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली. माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या तब्येतीची विचारपूसही त्यांनी केली. त्यानंतर आ. आवाडे व आ. कोरे यांच्यात तब्बल पाऊण तास चर्चा झाल्याचे वृत्त आहे; मात्र याचा तपशील समजू शकला नाही. रात्री उशिरा पुन्हा आ. आवाडे यांनी आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे व दोघांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचे समजते.
डॉ. राहुल आवाडे यांनी पुन्हा आ. डॉ. कोरे यांची वारणानगर येथे भेट घेतल्याची चर्चा आहे.या भेटीमुळेही चर्चांना उधाण आले आहे. डॉ. राहुल आवाडे अद्यापही निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची चर्चा आहे. त्यातच या वाढलेल्या राजकीय भेटीगाठींमुळे त्यांची भूमिका कधी स्पष्ट होणार, याकडे लक्ष लागले आहे.