निवडणुकीच्या काळात इतकीच रोख रक्कम ठेवता येणार जवळ….

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र जोर देत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केलीय. काही ठिकाणचे सोडले तर जवळपास सर्व ठिकाणचे उमेदवार देखील निश्चित झाले आहे. दरम्यान या निवडणुकीच्या (Election) काळात सर्वानांच एक प्रश्न पडला असेल, तो म्हणजे या काळात आपण सोबत किती रोख रक्कम ठेऊ शकतो. निवडणुकीत पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोगान सोबत पैसे ठेवण्याची मर्यादा निश्चित केली आहे.  निवडणूक लोकसभेची असो किंवा विधानसभेची असो यामध्ये पैशांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर झालेला दिसतो.

तसेच या काळात जास्त रक्कम ठेवल्याबद्दल कारवाई देखील होते. या काळात पैशांचा गैरवापर होऊ नये म्हणून निवडणूक आयोग काही मर्यादा घालून देते. या मर्यादेच तुम्हाला रोख रक्कम जवळ बाळगावी लागते, अन्यथा तुमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असते. सध्या लोकसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे. येत्या 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसहिंता राज्यात लागू करण्यात आली आहे.

आचारसहिंताचे नियम केवळ उमेदवारांसाठीच नाहीतर राज्यातील सामान्य जनतेसाठी देखील आहेत. यामध्ये तुम्ही जवळ किती रोख रक्कम ठेऊ शकता किंवा किती रुपयांचे दागिणे सोबत ठेऊ शकता यावर मर्यादा घालण्यात आली आहे. निवडणूक आोगाच्या नियमानुसार तुम्ही  50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम किंवा 10,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या भेटवस्तू असल्यास, तुम्हाला कागदपत्रे दाखवावी लागतील. अन्यथा तुमची रक्कम जप्त केली जाईल.